१) श्री. लिंगेश्वर देवस्थान,लिंगदेव,ता.अकोले, जि.अहमदनगर - ऎतिहासिक महत्त्व :
- १). शहाजीराजे यांचे श्रद्धास्थान:- मूळ स्वयंभू असलेले भगवान श्री.लिंगेश्वर महादेव हे मराठ्यांचे इतिहास काळापासूनचे श्रद्धास्थान आहे.
शहाजीराजांनी अनेकदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला.परंतु तो यशस्वी झाला नाही. स्वराज्य स्थापनेचा हा संकल्प शहाजीराजांनी प्रथम श्री.लिंगेश्वर महादेव मंदिरातच केला.या प्रयत्नास जरी यश आले नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रयत्नातून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मात्र मिळाली. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्यात यशस्वी झाले.
- २). पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून जिर्णोद्धार कार्य :- इ.स.१७७५ ते १७९० या कालखंडात अहिल्यादेवी होळकर यांनी भरतखंडात अनेक सुधारणा केल्या. लिंगदेव येथील श्री.लिंगेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धारही अहिल्यादेवींनीच केला. याच बरोबर पिण्याच्या पाण्याची बारव पुण्य श्लोक अहिल्यादेवींनीच बांधली.
- ३). असामान्य पर्यटन स्थळ :- सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले व उंच उंच पर्वत रांगांच्या सानिध्यात असलेले, परंतु पवित्र अशा मुळा नदीच्या तीरावर वसलेले अतिशय निसर्गरम्य परिसर लाभलेले म्हणजे श्री.लिंगेश्वर महादेव देवस्थान मंदिर होय. या इतर पर्यटनस्थळापेक्षा विशेष बाब आहे. या पर्यटनस्थळाचा ( तीर्थक्षेत्राचा ) महाराष्ट्र शासनाकडून विकास करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे हे पर्यटनस्थळ महाराष्ट्रातील यात्रेकरूंचे खास आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे श्री क्षेत्र श्री.लिंगेश्वर महादेव हे तीर्थक्षेत्र विकसित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय उचित व त्यामुळे अभिनंदनीय आहे. महाराष्ट्रातील इतर पर्यटनस्थळापेक्षा आगळे वेगळे असे हे तीर्थक्षेत्र आकारास येईल.
- ४). जागृत व जाज्वल्य देवस्थान :- श्री भगवान लिंगेश्वर महादेव हे स्वयंभू व अपरिमित असे जागृत व जाज्वल्य देवस्थान आहे. सर्वच यात्रेकरूंना याचा अनेक वर्षापासून अनुभव आलेला आहे. श्री लिंगेश्वरास सोडलेले संकल्प पूर्णत्वास गेल्याची इतिहास काळापासून अनेकांना खात्री पटली आहे.
-
४).सर्व धर्म समभाव :- श्री.लिंगेश्वर मंदिर हे सर्व जातीधर्मियांना खुले आहे. सर्व जातीधर्मांचे गावकरी एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. श्री.लिंगेश्वर महादेवाच्या
गुढीपाडवा यात्रेतील संगीत आखाडीमध्ये आमच्या गावाचा राजमोहम्मूद शेख सुदधा प्रभूरामचंद्राचे पात्र घेऊन भूमिका सादर करतो. हिंदूही पीरबाबाची यात्रा साजरी करतात.
श्री लिंगेश्वर महादेव क्षेत्र हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे दररोज शेकडो व वर्षभर हजारो यात्रेकरू येत असतात.
भरपूर पाणी, मोकळी प्रशस्त जागा स्वच्छ व आरोग्यदायक हवा असल्याने पर्यटन क्षेत्री यात्रेकरू खूप आनंदी व समाधानी असतात .शिवाय श्री लिंगेश्वर महादेव क्षेत्र हे ध्वनी प्रदूषण,हवा प्रदुषण व जल प्रदुषण विरहित आहे .
गुढीपाडव्याच्या दिवशी हा यात्रोत्सव संपन्न होत असतो. अकोले तालुक्यातील सर्वात मोठा यात्रा उत्सव म्हणून याची ख्याती आहे. भव्य शोभायात्रा , दंडवते , प्रसादवीतरण , महाप्रसाद व रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील ख्यातनाम अशी संगीत आखाडी कार्यक्रम असतो. रामायण , महाभारत , विष्णूपुराण या मधील दृश्ये पथनाट्याच्या स्वरुपात सादर केली जातात. दरवर्षी लिलावाच्या रूपाने गावकरी ही पात्रे प्राप्त करतात. दर वर्षी या लिलावातून देवस्थानला २ ते ३ लाख रुपये प्राप्त होतात. या संगीत आखाडीसाठी प्रकाश , ध्वनी , ड्रेपरी व इतर बाबी देवस्थानकडून पुरवल्या जातात. यात्रेसाठी यापूर्वी परकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. दूरदर्शनच्या अनेक वाहिन्या या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर राहतात.
संगीत आखाडी :
रात्री ७ ते स. ७ या वेळेत एकूण १२ तास महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीत आखाडी हा अनन्य साधारण व वैशिष्टयपूर्ण असा संगित आखाडीचा कार्यक्रम सादर केला जातो. या आखाडीमध्ये गावातील कुशल,श्रद्धाळू, अभिनय संपन्न असे ग्रामस्थ विविध प्रकारच्या धार्मिक व्यक्तीरेखा सादर करतात. या आखाडीमध्ये रामायण , महाभारत,
विष्णुपुराण यामधील ठळक प्रसंग पथनाट्याच्या स्वरूपात सादर केले जातात. रात्रीच्या याकार्यक्रमास १ लाखापेक्षा अधिक भाविक प्रेक्षक उपस्थित असतात. यात्रेच्या अगोदर १० दिवस आखाडी पात्रांचा लिलाव केला जातो. त्यानुसार पात्रांचे सादरीकरण केले जाते. याच रात्री सर्व यात्रेकरुसाठी देवस्थान संस्थेकडून महाप्रसाद अन्नदान केले जाते.
जंगी हगामा :
यात्रेच्या शेवटच्या दिवशी जंगी हगामा ठेवण्यात येतो. या हगाम्यात १५० पेक्षा जास्त योग्य जोड पाहून कुस्त्या लावल्या जातात. या साठी २५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाते. शेवटची कुस्ती रु.२ हजार पेक्षा अधिक रकमेला लावण्यात येते. या हगाम्यासाठी कोल्हापूर,सातारा,पुणे,नाशिक व नगर या क्षेत्रातून नामवंत कुस्तीगीर हजेरी लावतात.
श्रावणमास :
श्रावणमासात दर सोमवारी विशेष यात्रा भरत असते. त्याचप्रमाणे या महिन्यात भाविकांची दर्शनासाठी दररोज गर्दी असते. त्याचप्रमाणे या महिन्यात सव्वा लाख बेलपत्रांनी श्री.लिंगेश्वर महादेवाची विधिवत पूजा केली जाते.या महिन्यात ५० हजारापेक्षा अधिक यात्रेकरू भेट देतात.
महाशिवरात्री उत्सव :
महाशिवरात्रीच्या पर्वात भव्य अशा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे दररोजचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. पहाटे ४ ते ६-काकडा भजन, सकाळी ८ ते ११- ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११ ते १-अन्नदान, दुपारी २ ते ४ –गाथा भजन, दुपारी ४ ते ५ –प्रवचन, सायं. ५ ते ६ –हरिपाठ ,रात्री ६ ते ८ –अन्नदान, रात्री ९ ते ११ – हरिकीर्तन, रात्री ११ ते ४ – हरीजागर. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर महायात्रा भरत असते. या दिवशी दुपारी ३ ते ७ या वेळेत जंगी पालखी प्रदक्षिणा मिरवणूक संपन्न होत असते. या पालखी प्रदक्षिणेत हजारो भाविक सहभागी होतात. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी समस्त भाविकांना महाप्रसाद अन्नदान करण्यात येते.
गुढीपाडव्याच्या दिवशी हा यात्रोत्सव संपन्न होत असतो.रात्री ७ ते स. ७ या वेळत एकूण १२ तास महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतसंगीतआखाडी हा अनन्य साधारण व वैशिष्टयपूर्ण असा संगित आखाडीचा कार्यक्रम सादर केला जातो. या आखाडीमध्ये गावातील कुशल,श्रद्धाळू, अभिनय संपन्न असे ग्रामस्थ विविध प्रकारच्या धार्मिक व्यक्तीरेखा सादर करतात. या आखाडीमध्ये रामायण , महाभारत, विष्नुपुराण यामधील ठळक प्रसंग पथनाट्याच्या स्वरूपात सादर केले जातात. रात्रीच्या याकार्यक्रमास १ लाखापेक्षा अधिक भाविक प्रेक्षक उपस्थित असतात. यात्रेच्या अगोदर १० दिवस आखाडी पात्रांचा लिलाव केला जातो. त्यानुसार पात्रांचे सादरीकरण केले जाते. याच रात्री सर्व यात्रेकरुसाठी देवस्थान संस्थेकडून महाप्रसाद अन्नदान केले जाते.
आखाडी कार्यक्रमातील प्रमुख दृश्ये :
|
|
|
इतर कार्यक्रम:
सामुदायिक विवाह :
श्री. लिंगेश्वर देवस्थानच्या वतीने सन १९९५ पासून सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. या विवाहात सर्व जाती धर्माचे विवाह संपन्न होतात. सामुहिक विवाह उपक्रम राबविणारी श्री. लिंगेश्वर देवस्थान ही अहमदनगर जिल्ह्यातील पहिली संस्था आहे.
आरोग्य शिबिरे :
श्री. लिंगेश्वर देवस्थानच्या वतीने मोती बिंदू शिबीरे, सर्वरोग निदान शिबीरे व इतर आरोग्य शिबीरे आयोजित केली जातात. त्यामुळे अनेक लोकांना दृष्टी प्राप्त झालेली असून इतर रोगातुनही मुक्तता झाली आहे.
इतर कार्यक्रम :
वरील समारंभाव्यतिरिक्त वर्षभरात -
|
|
|
आदी उत्सव साजरे केले जातात. त्यावेळी शेकडो भाविक उपस्थित असतात.
|
|
|