श्री लिंगेश्वर देवस्थानने पूर्ण केलेले प्रकल्प :-

१) सभागृहाचे बांधकाम:- गावकऱ्यांनी व संस्थेने एकत्र निर्णय घेऊन सभा, कार्यक्रम, उत्सव साजरे करण्यासाठी १९८४ साली आर.सी.सी. सभामंडपाचे काम केले. याकामी मे. ठाकूर सावदेकर या विडी उद्योगातील उद्योगपतींची आम्हाला मोलाची मदत झाली.

२)धर्मशाळा जीर्णोद्धार :- अकोले तालुक्यातील जुन्या काळातील सर्वात मोठी धर्मशाळा आमच्या लिंगेश्वर देवस्थानची होती. एकून ५६ खणांची इंग्रजी सी आकाराची ही धर्मशाळा अनेक पांथस्थांची आधारदायिनी ठरली. या धर्मशाळेचे सिलिंगचे काम पूर्णतः नूतनीकरण व फ्लोरिंगला फरशी बसविण्याचे काम संस्थेने केले. भिंतीचे बांधकाम पक्के केले.

३) श्री.लिंगेश्वर मंदिराचे सुशोभीकरण:- पूर्वीचा यवन काळातील पांढरा रंग पूर्णतः काढुन तेथे सुंदर असा ऑईलपेंट देण्यात आला. लाईटनिंग करून मंदीराच्या सुंदरतेत भर घातली. काम्पाउंड वॉल बांधकाम केले. मंदीराच्या परिसरात गेल्यावर सुख, शांती, समाधान मिळेल असे वातावरण त्याठिकाणी तयार केले आहे.

४) बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन :- विवाह, नाटकांचे कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, व्यायाम, दशक्रियाविधी , भोजनाचे कार्यक्रम हे कार्यक्रम सुलभरितीने करता यावेत म्हणून आमचे संस्थेने हे खुले भवन बांधलेले आहे. २० आर क्षेत्रात हे बांधकाम केलेले असून तेथे २४ तास पाणी व स्वच्छतागृह व स्नानगृहांची उत्तम सोय आहे. या भवनाचे काम सन १९९३ मध्ये पूर्ण केले.

५) आळंदी धर्मशाळा बांधकाम :- श्रीक्षेत्र आळंदी येथे अगस्ति आश्रमाकडून भूखंड घेवून देवस्थान संस्थेने तेथे गावकऱ्यांसाठी व वारकऱ्यांसाठी धर्मशाळेची खोली बांधली आहे. सर्व आश्रमातील आमची ही खोली भक्कम व आर. सी.सी. बांधकामात केलेली आहे.

६) दत्तमंदिर बांधकाम: श्री लिंगेश्वर मित्रमंडळ मुंबई यांच्या सहकार्याने सन १९९० साली दत्तमंदिराचे काम पूर्ण केले. दत्तभक्तांची सोय व्हावी, हा यामागील हेतू ठेवून ह्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.

७) चिरेबंदी ओटा [ शिवतीर्थ जोते]:- सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून व मंदिराचा दर्शनी भाग सुंदर व सुखदायी असावा ह्या हेतूने जुने बांधकाम पाडून तेथे चिरेबंदी बांधकामाची निर्मिती केली. पाथरवट कलाकार प्राप्त करून वांबोरी व कोल्हेवाडी येथून चिरेबंदी चांगला दगड आणून हा शिवतीर्थ ओटा साकारण्यात आला आहे. १००फुट लांब व ३६ फुट रुंद अशी प्रदीर्घ चिरेबंदी आहे. या वास्तुचे अनावरण गुढीपाडवा दि १८/३/१९९९ रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुहस्ते व सिन्नर बिडी उद्योगाचे मालक श्रीमान श्रीरंगशेठ सारडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

८) दिपमाळ बांधकाम :- सन२००१-२००२ मध्ये देवस्थान संस्थेने या भव्य चिरेबंदी दिपमाळीचे बांधकाम केले. पूर्णपणे कोल्हेवाडी दगडात ३० फुट उंचीच्या या दिपमाळीला एकूण ३२ पायऱ्या आहेत. अलिकडच्या काळातील नगर जिल्ह्यातील ही पहिलीच दीपमाळ आहे.

९) हनुमान मंदिर / शनिमंदिर :- श्री.लिंगेश्वर महादेव संस्थेने सन. २००५-०६ यावर्षी हनुमानमंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन आर.सी.सी. भव्य मंदिराचे बांधकाम केले आहे. त्यामध्ये हनुमानाप्रमानेच शनीमूर्तीचीही प्रतिष्ठापना केलेली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे शुभ हस्ते व करवीर हिंदु पीठाचे शंकराचार्य स्वामी नृसिंहभारती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

१०) श्री. लिंगेश्वर मार्केट :- व्यावसायिकांची सोय म्हणून देवस्थानाने आर.सी.सी. मार्केटची/गाळ्यांचे बांधकाम कलेले आहे.

११) तीर्थविकास निधीतून नवे सभागृह :- श्री लिंगेश्वरदेवस्थानला महाराष्ट्र शासनाने "क" वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिलेला आहे. या निधीतून ८० फूट लांब व ४०फूट रुंद असा भव्य आर.सी.सी. सभामंडप बांधण्यात आलेले आहे. तालुक्यातील हा सर्वात मोठा आर.सी.सी सभामंडप आहे. मा.ना.मधुकररावजी पिचड साहेंब यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्णत्वास गेले आहे. या बांधकास २० लाख रुपये खर्च आला.

१२)स्वच्छतागृह :- तीर्थाविकास योजनेतून नवीन असे सर्व सोयीनी युक्त असे स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे. स्त्री-पुरुषांसाठी स्नानगृंहे,संडास व मुताऱ्या यांनी युक्त असे हे स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे. यासाठी ५ लाख रुपये खर्च आला आहे.

१३) नियोजित भक्तनिवास :- भाविकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून देवस्थानाने ४८ लाख रुपये खर्चाचे सर्व सोयीनी युक्त असे भक्तनिवास बांधण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र शासनाच्या तीर्थ विकास नीधीतून या कामास मंजुरी मिळालेली आहे. नीधी जमा होताच साधारणतः जाने. २०१४ मध्ये या भव्य बांधकामास सुरवात होईल.

१३) नियोजित कामे :- १) श्री.लिंगेश्वर उद्यान २) विस्तारित पाणीपुरवठा योजना ३) वाहन तळ ४) दवाखाना

तरी सर्व भाविकांनी या आगामी लोकोपयोगी कामांना सढळ हातांनी मदत करावी हि विनंती.

.......................................................................................................................................................................................

मदतीसाठी पत्ता ...

श्री. लिंगेश्वर महादेव व मारुती देवस्थान ट्रस्ट कार्यालय लिंगदेव, ता.अकोले,जि.अहमदनगर.
१) ए. डि . सी. सी. बँक शाखा लिंगदेव ता.अकोले,जि.अहमदनगर.
चालू खाते नं. – ११.

२) भारतीय स्टेट बँक शाखा-अकोले, ता.अकोले,जि.अहमदनगर.
शाखा कोड नं.- ११६६.
अकाऊंट नं.- ११५८४४६४१३७.


केलेली ठळक कार्ये :



  • श्री लिंगेश्वर सभामंडप
  • धर्मशाळा जीर्णोद्धार
  • परिसरात शहाबादी फरशी
  • चिरेबंदी ओटा ( शिवतीर्थ )
  • चिरेबंदी दिपमाळ ( शिवदीप )
  • दत्तमंदिर
  • हनुमान मंदिर
  • शनिदेव मंदिर
  • सांस्कृतिक भवन  
  • लिंगेश्वर मार्केट
  • आळंदी धर्मशाळा
  • नवा भव्य मंडप
  • स्वच्छता गृह
  • देवस्थानला शासनाचा ' क ' वर्ग दर्जा
  • भव्य जंगी यात्रा उत्सव व संगीत आखाडी
  • अखंड हरिनाम सप्ताह
  • सामुहिक विवाह
  • आरोग्य शिबीरे


फोटो गॅलरी ...